93 वा वाढदिवस

काशिनाथ घाणेकर यांचा आज 93 वा वाढदिवस आहे. 14 सप्टेंबर 1930 रोजी त्यांचा जन्म झाला. आज त्यांच्याविषयी काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

Sep 14,2023

पहिल्या पत्नीपासून घटस्फोट

काशिनाथ घाणेकर हे मद्याच्या आहारी गेले होते. त्यांच्यावर आलेल्या चित्रपटातूनही याचे दाखले मिळतात. त्यांच्या पहिल्या पत्नी या इरावती भिडे होत्या. त्याही डॉक्टर होत्या आणि स्त्रीरोगतज्ञ होत्या. त्याचा घटस्फोट झाला.

...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

2018 साली त्यांच्या जीवनावर आधारित '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट आला होता. सुबोध भावेनं या चित्रपटातून त्यांची भुमिका केली होती.

मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार

काशिनाथ घाणेकर हे मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार. त्यांची एन्ट्री होताच आणि, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर हे नावं विगेंतून आल्यानंतर मात्र प्रेक्षकागृहात टाळ्या, शिट्ट्या वाजायच्या.

नाथ हा माझा

कांचन घाणेकर यांनी पती काशिनाथ घाणेकर यांच्यावर 'नाथ हा माझा' हे पुस्तक लिहिले होते. जे प्रचंड गाजले त्यात त्यांनी अनेक खुलासे केले होते. त्यांच्या लग्नावर सुलोचना दीदीही नाखुश होत्या.

पहिल्याच नजरेत प्रेम

कांचन घाणेकर यांनी अनेक मुलाखतीतून सांगितले आहे की त्या पहिल्याच नजरेत त्यांच्या प्रेमात पडल्या. रंगभूमीवरील त्यांचा वावर हा अद्वितीय होता.

रायगडाला जेव्हा जाग येते

वसंत कानेटकर यांच्या 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकात जेव्हा काशिनाथ घाणेकर छत्रपती संभाजी महाराज्यांच्या भुमिकेतून दिसले होते. त्यांच्या या भुमिकेला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता.

परीक्षेच्या नोट्स बसच्या तिकिटावर

काशिनाथ घाणेकरांचे रंगभूमीवर त्यांचे प्रचंड प्रेम होते, असं कांचन घाणेकर या म्हणाल्या होत्या. काशिनाथ घाणेकर हे दातांचे डॉक्टर होते. त्यावेळी परीक्षेच्या नोट्स ते बसच्या तिकिटावर लिहायचे अशी कांचन घाणेकरांनी आठवण एका मुलाखतीदरम्यान सांगितली होती.

VIEW ALL

Read Next Story