साऊथचा सुपरस्टार यशने आपल्या चित्रपटामुळे नवा इतिहास रचला. 'केजीएफ' या पॅन इंडिया चित्रपटाने दक्षिणेकडील उद्योगाला पुनरुज्जीवन दिले.
'केजीएफ' आणि 'केजीएफ 2' चित्रपटांमध्ये दमदार कलाकार, धडाकेबाज कथा आणि खलनायक होते. या चित्रपटांमधील गरुडा हे पात्र तुम्हाला नक्कीच लक्षात राहिले असेल.
रामचंद्र राजूने गरुडा ही भूमिका साकारली. मात्र, तुम्हाला माहित आहे का की रामचंद्र राजू हा यशचा बॉडीगार्ड आहे?
राजूचे पत्नी आणि दोन मुलांचे सुंदर कुटुंब आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ रामचंद्र राजू नेहमीच शेअर करत असतो.
चित्रपटाचे दिग्दर्शक यशला चित्रपटाची पटकथा सांगण्यासाठी गेले होते, त्यावेळी त्यांची भेट रामचंद्र राजूशी झाली.
रामचंद्र राजूच्या लूकने दिग्दर्शक खूप प्रभावित झाले. त्यामुळे रामचंद्र राजूला गरुडा भूमिकेसाठी निवडण्यात आले. ही भूमिका प्रेक्षकांनाही खूप आवडली.
'केजीएफ' चित्रपटाने जगभरात 250 कोटींची कमाई केली, तर 'केजीएफ 2' चित्रपटाने 1,250 कोटींची कमाई केली.