'या' स्टार्सनी रिजेक्ट केली होती शाहरुख खानच्या 'वीर झारा' ची ऑफर

सुपरस्टार शाहरुख खान आणि अभिनेत्री प्रीती झिंटा यांचा सुपरहिट चित्रपट 'वीर झारा' पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये सिरीज केला जाणार आहे.

13 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारत भरात हा चित्रपट पुन्हा रिलीज केला जाणार आहे. आज अशा स्टार कलाकारांबद्दल जाणून घेऊयात ज्यांनी या चित्रपटाची ऑफर रिजेक्ट केली होती.

अजय देवगण :

या चित्रपटात मनोज बाजपेयी यांनी प्रीती झिंटाच्या होणाऱ्या नवऱ्याचा रोल केला होता. मात्र चित्रपटाच्या मेकर्सनी या रोलसाठी अजय देवगणला विचारणा केली होती.

काजोल :

'वीर झारा' चित्रपटासाठी मेकर्सनी मुख्य अभिनेत्री म्हणून काजोलला अप्रोच केलं होतं. मात्र काजोलने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला.

मनीषा कोईराला :

ऍडव्होकेट सामिया सिद्दकीच्या रोलसाठी चित्रपटाच्या मेकर्सनी मनीषा कोईराला हिला विचारणा केली होती. मात्र ती त्यावेळी अन्य प्रोजेक्ट्स करण्यात बिझी होती ज्यामुळे तिने हा चित्रपट केला नाही.

ऐश्वर्या राय :

सामिया सिद्दकीच्या रोलसाठी मेकर्सनी अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला सुद्धा विचारणा केली होती. मात्र नंतर मेकर्सनी या रोलसाठी राणी मुखर्जीची निवड केली.

बॉक्स ऑफिस कलेक्शन :

'वीर झारा' या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. हा चित्रपट केवळ 23 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई केली.

'वीर झारा' हा चित्रपट 2004 रोजी रिलीज झाला होता, या चित्रपटामुळे शाहरुख आणि प्रीती झिंटा यांच्या प्रसिद्धीत मोठी वाढ झाली होती.

VIEW ALL

Read Next Story