नारळाचे पाणी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.
नारळाच्या पाण्यामध्ये विटामिन C, विटामिन ई, आयरन , कैल्शियम आणि मॅग्नीशियम इत्यादी पोषक तत्व असतात.
ज्या लोकांना किडनीशी संबंधित आजार किंवा समस्या आहेत त्यांनी नारळाचे पाणी पिऊ नये.
यामध्ये पोटेशियमचे प्रमाण खूप असते. त्यामुळे किडनी त्याला फिल्टर करू शकत नाही. त्यामुळे किडनीचा धोका आणखी वाढू शकतो.
डायबिटीज असणाऱ्या व्यक्तीने नारळाचे पाणी कमी प्रमाणात प्यावे. कारण नारळाच्या पाण्यात कार्बोहाइड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ब्लड शुगर वाढण्याची शक्यता असते.
सतत लघवी येणाऱ्या व्यक्तीने नारळाचे पाणी पिऊ नये. त्यासोबतच ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी नारळाचे पाणी पिऊ नये.