मौनी रॉयने 'नागिन' सारख्या हिट मालिकेमध्ये काम केले आहे. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपट आणि सिरीजमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
विक्रांत मेस्सी हे बॉलिवूडमध्ये एक मोठे नाव बनले आहे. पण एक काळ असा होता जेव्हा तो टीव्ही स्टार होता. त्याने अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे.
अभिनेत्री मृणाल ठाकूरने हिट मालिकांमध्ये काम केले आणि त्यानंतर मृणालने चित्रपटांमधून पदार्पण करुन प्रेक्षकांची मने जिंकली. आज मृणाल बॉलिवूड तसेच साउथमधील चित्रपटांमध्ये काम करते.
अभिनेत्री यामी गौतमने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'चांद के पार चलो' या मालिकेतून केली. त्यानंतर तिने अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम करुन बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली.
अभिनेत्री राधिकाने तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरूवात 'मेरी आशिकी तुमसे ही' या मालिकेतून केली. त्यानंतर तिने 'पटाखा' या चित्रपटातून पदार्पण करुन बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
अभिनेता रोनित रॉयने टीव्ही ते बॉलिवूडपर्यंत मोठे नाव कमावले आहे. रोनित रॉयने प्रथम हिट मालिकांमध्ये काम केले आणि त्यानंतर चित्रपटांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली.
अभिनेत्री प्राची देसाईने टीव्ही मालिका ते चित्रपटसृष्टी असा प्रवास केला आहे. प्राची देसाईने अनेक हिट चित्रपटांमधून काम करून बॉलिवूडमध्ये नाव कमावले.
'जस्सी जैसी कोई नहीं' सारख्या मालिकेत काम केल्यानंतर मोनाने चित्रपटात काम करायला सुरुवात केली. तिची चित्रपट सृष्टीतील कारकीर्द यशस्वी ठरली.