मलायका अरोरा नेहमीच तिच्या हटके लूकमुळे चर्चेत राहते. तिचे फिटनेसही तितकेच कौतुकास्पद आहे. 51 वर्षांचे वय असूनही ती अत्यंत तरुण आणि फ्रेश दिसते.
सध्या ती आपल्या मुलगा अरहान खानसोबत इटलीतील सहल एन्जॉय करत आहे.
या फोटोंमध्ये आई-मुलगा जोडी एकत्र शहरात फिरताना, छान वेळ घालवताना आणि मस्ती करताना दिसते.
तिने इटलीच्या सौंदर्याने प्रभावित होत, फ्लोरेन्स शहराबद्दल 'मी फ्लोरेन्सच्या प्रेमात पडले आहे' असेही कॅप्शनमध्ये लिहिले.
तिच्या या पोस्टमध्ये वेगवेगळ्या आऊटफिट्समधील तिचे फोटो पाहायला मिळतात, ज्यामध्ये ती एकाहून एक हटके पोज देताना दिसते.
अरहानदेखील या ट्रिपमध्ये खूप रिलॅक्स मूडमध्ये दिसतो. एका फोटोमध्ये तो ड्रिंकचा आनंद घेताना आणि आईसोबत सहलीचा अनुभव लुटताना दिसतो.
मात्र, या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी मलायकाच्या कपड्यांवरून पुन्हा तिला ट्रोल केले आहे.