क्रिती सेनॉन या अभिनेत्रीने केवळ चित्रपटांमध्येच नाही तर व्यवसायातही स्वत:ला सिद्ध केले आहे. व्यावसायिक जगात तिने मोठे नाव कमावले आहे.
क्रिती सेनॉनच्या स्किनकेअर कंपनीने फक्त दोन वर्षांत प्रचंड प्रगती केली आहे.
तिच्या स्किनकेअर ब्रँड 'हायफेन'चे उत्पन्न ४०० कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.
कंपनीच्या ग्राहकांची संख्या फक्त एका वर्षात १० लाखांवरून ४० लाख झाली आहे.
तिच्या व्यवसाय प्रवासाबद्दल बोलताना, क्रिती म्हणाली की, गेली २ वर्षे हायफेनसाठी खूप खास होती आणि व्यवसायात तिनं उत्तम प्रगती केली.
पुढे ती असं म्हणते 'आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि आम्हाला त्यांच्या आयुष्यात समाविष्ट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मी आभारी आहे'.
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, क्रिती सेनॉन 'तीन पत्ती' या चित्रपटात दिसली होती.
या चित्रपटात अभिनयासोबतच तिने चित्रपट निर्मीतीचे काम सुद्धा केले आहे.
{सर्व छायाचित्र सौजन्य क्रिती सेनॉन हीच्या सोशल मिडीया अकाउंटवरून घेणयात आले आहेत.}