दी सायलेंट सी (6.9/10)

दी सायलेंट सी ही वेबसीरिज अंतराळ शास्त्राबद्दल कुतूहल असणाऱ्यांसाठी आहे. काही अंतराळवीर चंद्रावर एका मिशनसाठी जातात आणि त्यानंतर पुढे अनेक गोष्टी घडतात, यावर आधारित आहे. याचे दिग्दर्शन चोई हँग-याँग यांनी केले होते.

स्वीट होम (7.3/10)

स्वीट होम ही वेबसीरिज हॉरर कॉरिअन ड्रामा आहे. यात साँग कंग, ली जीन वूक आणि ली सी- यंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

दी किंग- एटरनेल मोनार्क (8.1/10)

'द किंग: एटरनेल मोनार्क' ही वेबसीरिज 2020 मध्ये प्रदर्शित झाली होती. यात ली मिन-हो, किम गो-ऊन आणि वो दो-हॉन यांसारखे अनेक कलाकार झळकले होते.

हेलबाऊंड (6.6/10)

हेलबाऊंड ही वेबसीरिज एका पौराणिक विषयावर आधारित आहे. या धार्मिक परंपरेमुळे समाजात निर्माण होणारे अंधविश्वास यावर भाष्य करण्यात आले आहे. ही वेबसीरिज भारतात चांगलीच लोकप्रिय ठरली.

सी यू इन माय 19th लाईफ (7.7/10)

या कोरिअन वेबसीरिजमध्ये शिन ही-सुन, आन बो-ह्यून, हा यून-क्युंग हे कलाकार झळकले होते. ही वेबसीरिज पुनर्जन्मावर आधारित होती.

स्क्विड गेम (8/10)

2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या स्क्विड गेम ही वेबसीरिज सुपरहिट ठरली. नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक पाहिली गेलेली कोरिअन वेबसीरिज म्हणून याला ओळखले जाते.

इटावन क्लास (8.2/10)

या कोरिअन वेबसीरिजला 25 व्या एशिअन टेलिव्हिजन अॅवॉर्ड शोमध्ये लोकप्रिय वेबसीरिज असा अॅवॉर्ड मिळाला होता. या कलाकारांनी दमदार भूमिका साकारली होती.

बिजनेस प्रपोजल (8.1/10)

या कोरिअन वेबसीरिजमध्ये लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. एका कंपनीचा सीईओ हा ब्लाईंड डेटवर जातो, पण अचानक कथेत एक मोठा ट्वीस्ट येतो आणि पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

इट्स ओके टू बी नॉट ओके (8.6/10)

इट्स ओके टू बी नॉट ओके ही वेबसीरिज मानसिक आरोग्य, काळजी आणि प्रेम यावर आधारित आहे. ही वेबसीरिज प्रचंड लोकप्रिय आहे. या वेबसीरिजला अनेक लोक पसंती दर्शवत आहेत.

क्रॅश लँडिंग ऑन यू (8.7/10)

या वेबसीरिजमध्ये दक्षिण आणि उत्तर कोरियामधील कथा दाखवण्यात आली आहे. त्यामुळे ही वेबसीरिज सर्वत्र लोकप्रिय आहे.

VIEW ALL

Read Next Story