अरेच्चा! मराठी जोडप्यात 'इतक्या वर्षांच अंतर'; जाणून वाटेल आश्चर्य

Nov 20,2023


मराठी फिल्म इंडस्ट्रीत असे काही कपल आहेत, ज्यांच्या वयात आठ वर्षांपेक्षा अधिकचे अंतर आहे.


आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारे अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ या दोघांच्या वयात तब्बल 18 वर्षांचे अंतर आहे.


मराठीतील क्यूट कपल उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या वयात आठ वर्षांचे अंतर आहे.


सोनाली खरे आणि बिजय आनंद यांच्या वयात 27 वर्षाचं अंतर आहे, बिजय हा हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. या दोघांच्या वयातील अंतराची चर्चा नेहमीच होत असते.


दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रसिद्ध झालेले सुव्रत जोशी आणि सखी गोखले या जोडप्यात आठ वर्षाचं अंतर आहे.


मराठी इंडस्ट्रीतील सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर ही एक जोड अशी आहे, ज्यांच्यात तब्बल 10 वर्षांचे अंतर आहे.


बिग बॉस मराठी फेम आणि दिग्दर्शक ,निर्माते महेश मांजरेकर आणि पत्नी मेधा मांजरेकर यांच्यात देखील 9 वर्षाचे अंतर आहे.

VIEW ALL

Read Next Story