7 Reasons: का पुन्हा-पुन्हा पाहावासा वाटतो 'तुंबाड'?

माणसाला असलेले लोभ

या चित्रपटाचा स्क्रीनप्ले माणसाच्या लोभ, भय आणि तत्कालीन गावातल्या जातीभेद यांचे मिश्रण इतक्या प्रभावीपणे दाखवतो की तुंबाड पुन्हा-पुन्हा पाहावासा वाटतो.

चित्रपट बनवण्यासाठी लागली इतकी वर्षे

हा संपूर्ण चित्रपट पावसाळ्यात शूट करण्यात आला आहे. त्यासाठी त्यांनी कोणता कृत्रिम पावसाचा वापर केला नाही तर त्यांनी नैसर्गिक पावसातच संपूर्ण शूटिंग केलं. तर यासाठी 6 वर्षांचा कालावधी लागला.

गरजेपूर्त्या गोष्टी आपल्याकडे आहेत पण

प्रत्येक माणसाला जितकी आवश्यकता आहे तितक्या सगळ्या गोष्टी आहेत, पण लोभी माणसासाठी ते कधीही कमी पडत नाही.

आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे

'तुंबाड' या चित्रपटाची पटकथा ही आपले आजी-आजोबा आपल्याला सांगत असलेल्या पंचंतंत्र आणि विक्रम वेताळच्या गोष्टींप्रमाणे आहेत. तर याचं शूटिंग अशा ठिकाणी झालं आहे जिथे गेल्या 100 वर्षांपासून कोणी गेलं नव्हतं.

हस्तर का कोणाला मारत नाही?

हस्तर थेट मारत का नाही असा प्रश्न सर्वांना पडतो. याचं उत्तर असं की हस्तरचा स्पर्श झाल्यास माणसाला अमरत्व प्राप्त होते. पण हा वरदान एक शाप आहे. यात माणूस सडला, कुजला तरी मरत नाही. अर्थातच लोभी होऊन जगण्यापेक्षा मृत्यू आलेला बरा असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला.

चित्रपटानं केली इतकी कमाई

हा चित्रपट फक्त 5 कोटींमध्ये बनावण्यात आला तर त्यानं बॉक्स ऑफिसवर 13.6 कोटींची कमाई केली.

मास्टरपिस

हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. हा चित्रपट थिएटरमध्ये चांगली कमाई करू शकला नसला, तरी देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याला खूप चांगली पसंती मिळाली आहे. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story