'तो माफी मागत नाही तोपर्यंत...' सलीम खान सलमानला देतात अशी शिक्षा

Intern
Apr 05,2025


सलमान खान हा आपल्या कुटुंबाशी खूपच जवळचा आहे. त्याचे आणि वडील सलीम खान यांचे नातं अतिशय खास आहे.


सुपरस्टार असूनही, सलमान जेव्हा एखादी चूक करतो, तेव्हा त्याला त्याच्या वडिलांकडून शिक्षा मिळते, जाणून घेऊयात नेमकी कोणती शिक्षा ते सलमानला देतात.


सलीम खान सलमानवर अत्यंत प्रेम करतात. मात्र, सलमानने काही चुकीचं वागल्यास ते त्याच्याशी बोलणंच थांबवतात. या गोष्टी त्यांनी एका मुलाखतीदरम्यान उघड केल्या.


सलीम खान म्हणाले की, 'जेव्हा मला सलमानच्या वागण्यात काही खटकतं किंवा त्याने चूक केली आहे असं वाटतं, तेव्हा मी त्याच्याशी बोलणं थांबवतो. मी महिनोंनमहिनेही न बोलता राहू शकतो.'


पुढे ते म्हणाले, 'जोपर्यंत सलमान स्वतः येऊन त्याच्या चुकीची कबुली देत नाही आणि माफी मागत नाही, तोपर्यंत मी त्याच्याशी बोलत साधत नाही.'


सलीम खान आपल्या मुलाच्या प्रत्येक यशात सहभागी असतात. त्यांनी सलमानच्या अनेक चित्रपटांच्या शूटिंग आणि ट्रेलर लाँच कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.


अलीकडेच ते 'सिकंदर'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमातही उपस्थित होते.


सलीम खान यांची ही वडिलकीची शिक्षा सलमानला योग्य गोष्टी शिकवण्यासाठी आणि त्याला जबाबदार ठेवण्यासाठी एक अनोखा मार्ग म्हणता येईल.

VIEW ALL

Read Next Story