हे काय करुन बसली उर्फी! एका सर्जरीने बिघडला चेहरा

अतरंगी फॅशन आणि बेधडक वक्तव्यामुळं चर्चेत असलेली उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी तिच्या फॅशनमुळं नाही तर तिने केलेल्या एका ब्यूटी ट्रिटमेंटमुळं ती ट्रोल होतेय.

Mansi kshirsagar
Jul 18,2023


उर्फी जावेदने डार्क सर्कलसाठी डोळ्यांच्या खाली एक सर्जरी केली होती. मात्र त्याचा उलटाच परिणाम तिच्या चेहऱ्यावर झाला आहे.


सोशल मीडियावर एक पोस्ट आणि बिघडलेल्या चेहऱ्याचा फोटो उर्फी जावेदने पोस्ट केला आहे. सोबतच एक पोस्टहही तिने लिहली आहे.


सोशल मीडियावर तिचा फोटो व पोस्ट व्हायरल झाल्यानंतर ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. ट्रोल झाल्यानंतर तिने फोटो डिलीट केला आहे.


त्याचे झाले असं की, उर्फीने डोळ्याखालील काळे पणा दूर होण्यासाठी ब्यूटी ट्रीटमेंट केली होती. मात्र, त्याचा चेहऱ्यावर परिणाम झाला आहे.


उर्फी ने म्हटलं आहे की, डार्क सर्कलमुळं मी सोशल मीडियावर खूप ट्रोल होत होते. म्हणून मी आयफिलर ट्रिटमेंट केली. मात्र ट्रिटमेंटचा व्यवस्थित झालीच नाही.


आय फिलर ट्रिटमेंट यशस्वी झालीच नाही. त्यामुळं माझा चेहरा आधीपेक्षाही खराब झाला आहे, असं उर्फीने म्हटलं आहे.


मेकअपच्या मदतीनेही माझ्या डोळ्याखालचे काळे डाग जाता जात नाहीयेत. मी स्वतःसोबतच हे काय करुन बसली, असंही तिने पुढे म्हटलं आहे.


मला लहानपणापासूनच डार्क सर्कलची समस्या होती. म्हणून मी आय फिलरची ट्रिटमेंट केली. मात्र आता माझा चेहरा बिघडला आहे, असं तिने म्हटलं आहे.


मी आशा करते की माझा चेहरा लवकरच पूर्ववत होऊदेत, अशी प्रार्थनाही तिने केली आहे.

VIEW ALL

Read Next Story