उर्वशी रौतेलाला चोराने पाठवला ई-मेल; म्हणाला 'iPhone परत करेन, पण तू आधी...'

Published by: Zee Team | Oct 18, 2023

उर्वशी रौतेलाचा 24 कॅरेट गोल्ड आयफोन चोरी

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा 24 कॅरेट गोल्ड आयफोन चोरी झाला होता.

Published by: Zee Team | Oct 18, 2023

चोराने पाठवला ई-मेल

उर्वशीने सोशल मीडियावरुन याची माहिती देताना मदत मागितली होती. त्यात आता उर्वशीला चोरानेच ई-मेल पाठवला आहे.

Published by: Zee Team | Oct 18, 2023

...तरच फोन परत करणार

आपणच तुझा आयफोन चोरला असून, माझ्या भावावर कॅन्सरवरील उपचार केल्यानंतरच मी तुला फोन परत करेन असं चोराने लिहिलं आहे.

Published by: Zee Team | Oct 18, 2023

'एक मदत करावी लागेल'

उर्वशीला हा ई-मेल पाहिल्यानंतर धक्का बसला आहे. माझ्याकडे तुझा आयफोन असून, तो परत हवा असल्यास एक मदत करावी लागेल असं त्याने लिहिलं होतं.

Published by: Zee Team | Oct 18, 2023

इंस्टाग्रामला स्क्रीनशॉट

Groww Traders नावाच्या आयडीवरुन उर्वशीला हा ई-मेल आला आहे. उर्वशीने इंस्टाग्रामला स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

Published by: Zee Team | Oct 18, 2023

खरंच चोर की संधीचा फायदा

पण काहींनी त्याच्याकडे खरंच फोन आहे का यावर शंका उपस्थित केली आहे. तो फक्त आपल्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न करत असावा असं त्यांचं म्हणणं आहे.

Published by: Zee Team | Oct 18, 2023

पोलिसांकडे का जात नाही, नेटकऱ्यांची विचारणा

अनेक नेटकऱ्यांनी उर्वशीच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलीस आयपी अॅड्रेसवरुन चोराला पकडू शकत असतानाही ती त्यांच्याकडे का जात नाही अशी विचारणा करत आहेत.

Published by: Zee Team | Oct 18, 2023

उर्वशीकडून बक्षिसाची घोषणा

उर्वशीने याआधी आपला 24 कॅरेट गोल्ड आयफोन चोरी झाला असून, जो माहिती देईल त्याला बक्षीस देऊ अशी घोषणा केली होती.

Published by: Zee Team | Oct 18, 2023

VIEW ALL

Read Next Story