400000 रुपयांचा पोपटाचा क्लच अन् Cannes 2025 च्या रेड कार्पेटवर अवतरली उर्वशी रौतेला

Tejashree Gaikwad
May 14,2025


मंगळवारी 13 मे रोजी उर्वशी रौतेलाने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली.


कान्स २०२५ च्या पहिल्या दिवशी अभिनेत्रीच्या पहिल्या रेड कार्पेट लूकने नेटिझन्सना चर्चा करायला भाग पाडले.


उर्वशी 'पार्टिर उन जर' या चित्रपटाच्या उद्घाटन समारंभ आणि स्क्रीनिंगसाठी उर्वशी रौतेला रेड कार्पेटवर चालली.


अभिनेत्रीने निळा, लाल आणि पिवळा स्ट्रॅपलेस स्ट्रक्चर्ड आउटफिट घातला होता आणि तिने तिचा लूक मॅचिंग टियाराने पूर्ण केला.


पण सर्वांच्या नजरा उर्वशीने हातात पडकलेल्या पोपट लुकचा क्रिस्टलने बनलेल्या क्लचवर होत्या.


डायट साब्याच्या इंस्टाग्राम पेजचा दावा आहे की हा क्लच ज्युडिथ लीबरने डिझाइन केला आहे.


उर्वशीच्या या क्लचची किंमत $५,४९५ अर्थात 4,68,064.10 रुपये आहे.


तिच्या या लूकचे व्हिडीओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले.

VIEW ALL

Read Next Story