Al Pacino 82 व्या वर्षी बाप होणार

दिग्गज अमेरिकन अभिनेता आणि दिग्दर्शक Alfredo James उर्फ Al Pacino 82 व्या वर्षी बाप होणार आहे. ही बातमी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल ना.

चौथ्यांदा होणार बाप

पण तुम्हाला माहिती आहे का, Al Pacino पहिल्यांदा नाही तर चौथ्यांदा बाप होत आहे.

29 वर्षीय गर्लफ्रेंड गर्भवती

TMZ च्या रिपोर्टनुसार, 82 वर्षीय अभिनेत्याची 29 वर्षीय गर्लफ्रेंड गर्भवती आहे. तिचं नाव Noor Alfallah आहे.

Noor Alfallah 8 महिन्यांची गरोदर

Noor Alfallah 8 महिन्यांची गरोदर आहे. अभिनेत्याच्या जवळच्या सूत्रांनी तो बाप होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

2022 मध्ये डेटिंगच्या चर्चा

Al Pacino आणि Noor Alfallah यांच्या नात्यांच्या चर्चा 2022 मध्ये चांगल्याच रंगल्या होत्या. दोघांना डिनर डेटवर स्पॉट करण्यात आलं आहे.

कोविडपासून डेटिंग

पेज सिक्सच्या सूत्रांच्या माहितीनुसार, कोविडमध्ये दोघेही एकमेकांना डेट करत होते. पण आता रिलेशनच्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला आहे.

वयात 53 वर्षांचं अंतर

वयात 53 वर्षांचं अंतर असलं तरी दोघांमध्ये फार दृढ नातं आहे.

वडिलांपेक्षाही जास्त वय

रिपोर्टनुसार, Al Pacino चं वय प्रेयसी Noor Alfallah च्या वडिलांपेक्षाही जास्त आहे.

एक्स गर्लफ्रेंडपासून 33 वर्षांची मुलगी

Al Pacino ला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडपासून 33 वर्षांची एक मुलगीदेखील आहे. तसंच दुसऱ्या एक्स गर्लफ्रेंडपासून 22 वर्षांची दोन जुळी मुलं आहेत.

सगळीकडे चर्चा

29 वर्षीय Noor Alfallah बद्दल बोलायचं गेल्यास ज्यावेळी तिचं नाव Al Pacino शी जोडलं गेलं तेव्हा ती फक्त 22 वर्षांची होती.

VIEW ALL

Read Next Story