एका मुलाखतीदरम्यान विक्कीने पत्नीसंदर्भात नेमका काय खुलासा केला पाहूयात...
कटरीना कैफ आणि विक्की कौशलची जोडी ही सध्याच्या आघाडीच्या बॉलिवूड कपल्सपैकी एक आहे.
कटरीना आणि विक्की हे त्यांच्या चाहत्यांसाठी अगदी कपल गोल्स सेट करणारं आदर्श जोडपं आहे.
मात्र नुकताच विक्कीने आपल्या पत्नीबद्दल म्हणजेच कटरीनाबद्दल एक खुलासा केला आहे.
पत्नी कटरीनाच्या कोणत्या गोष्टीमुळे आपण त्रास्त झालो आहोत किंवा तिची कोणती गोष्ट खटके याबद्दल विक्कीने भाष्य केलं आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विक्कीला कटरीनाची कोणती गोष्ट तुला अगदी हटके वाटते आणि तिच्या कोणत्या सवयीपासून तू स्वत:ला वाचवू इच्छितो किंवा तुला आवडत नाही असा प्रश्न विचारण्यात आला.
"कटरीनाची हटके गोष्ट ही आहे की ती फार साधी मुलगी आहे आणि तिला असं आयुष्य आवडतं," असं विक्की म्हणाला.
"माझं तिच्याशी (करिनाशी) लग्न झालं आहे हा विचार करुन जो मला खरंच आश्चर्य वाटतं," असंही विक्कीने सांगितलं.
"सकाळी झोपेतून उठण्यासंदर्भात आम्ही दोघे अगदी विरुद्ध आहोत. मला झोपेतून उठायलाच 2 तास लागतात. तर की सकाळीच फार उत्साही असते," असं विक्की म्हणाला.
"सकाळी झोपेतून उठल्यावर मला साधी बोलायची शुद्ध नसते अन् त्यावेळी ती सकाळी सकाळी एखादा विषय घेऊन बोलत बसते," असं विक्कीने सांगितलं.
"सकाळी चार कप कॉफी प्यायल्यानंतर मला शुद्ध येते आणि मी बोलू शकतो. त्यामुळेच तिच्या या सकाळच्या डिक्शनपासून मी दूर पळत असतो," असं विक्कीने सांगितलं. हीच गोष्ट आपल्याला आवडत नाही असं विक्कीने सांगितलं.
दोघांच्या जेवणाच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत का असा प्रश्नही विक्कीला विचारण्यात आला. त्यावर त्याने, "आमचं लग्न म्हणजे पराठ्याचं पॅनकेकबरोबर लग्न झाल्यासारखं आहे. तिला पॅनकेक आवडतात मला पराठे," असं उत्तर दिलं.
तशी कटरीनाही पराठे खाते पण ती तिच्या डाएटबद्दल फारच जागृक आहे, असंही विक्कीने यावेळेस नमूद केलं.