अनुष्काही अद्याप या अभिनेत्याबरोबर चित्रपटात झळकलेली नाही हे विशेष
क्रिकेटमधील किंग अशी ओळख असलेल्या विराटचे जगभरामध्ये कोट्यवधी चाहते आहेत.
विराट कोहलीला पाहण्यासाठी त्याची एक झळक टीपण्यासाठी चाहत्यांची धडपड सुरु असते. मात्र विराट कोणाचा चाहता आहे तुम्हाला ठाऊक आहे का?
विराटने नुकतेच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. विराटने त्याचा आवडता अभिनेता कोण याबद्दल बोलताना एका भारतीय अभिनेत्याचं नाव घेतलं आहे.
विराटने मी हृतिक रोशनचा फार मोठे चाहता असल्याचं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे.
'कहो ना प्यार है' चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ऋतिक रोशनबद्दल मला वाटणारी क्रेझ फार वाढली होती, असं विराटने सांगितलं.
"'कहो ना प्यार है' हा एक कल्ट सिनेमा आहे. मी तो चित्रपट पाहून अगदी वेडा झालो होतो. खास करुन हृतिकच्या डान्सचं वेगळचं वेड लागलं होतं," असं विराट म्हणाला.
विराटची पत्नी अनुष्का शर्मा ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मात्र तिनेही आतापर्यंत कधीच हृतिक रोशनबरोबर काम केलेलं नाही.
35 वर्षीय अनुष्काने शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानसारख्या दिग्गज कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर केली आहे.
मात्र ती अद्याप एकाही चित्रपटामध्ये विराटच्या आवडत्या अभिनेत्याबरोबर म्हणजेच हृतिक रोशनबरोबर झळकलेली नाही.
विराट आणि अनुष्काने 2017 साली 11 डिसेंबर रोजी लग्न केलं. दोघांना 2021 मध्ये एक मुलगी झाली असून तिचं नाव वामिका असं आहे.