सनी देओल आणि बॉबी देओल हे दोघेही भावंडे चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आहेत आणि त्यांना प्रचंड फॅन फॉलोविंग आहे.
दोघेही काही वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर राहिले होते, परंतु सनीने 'गदर 2' आणि बॉबीने 'अॅनिमल' चित्रपटातून दमदार कमबॅक केले.
हे दोघे जरी सनी आणि बॉबी म्हणून ओळखले जातात, परंतु हे त्यांचे खरी नावे नाहीत.
सनीचे खरे नाव अजयसिंग देओल आहे. त्याचे टोपण नाव 'सनी' असल्यामुळे त्याने चित्रपटसृष्टीत सनी नावानेच पाऊल ठेवले.
त्याने 1983 मध्ये 'बेताब' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तेव्हा 'अजय' ऐवजी 'सनी' हे नाव घेतले आणि नंतर तेच नाव प्रसिद्ध झाले.
बॉबीचे खरे नाव विजयसिंग देओल आहे. त्याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवताना बॉबी या नावाने काम केले.
बॉबी देओलने 1995 मध्ये 'बरसात' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्याला 'बेस्ट डेब्यू अॅक्टर'चा पुरस्कारही मिळाला होता