अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते सचिन पिळगांवकर आणि पत्नी अभिनेत्री सुप्रिया यांच्या जोडीवर आजही मराठी प्रेक्षक खूप प्रेम करतात. अभिनय क्षेत्रातील या दिग्गज जोडीने मराठी चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवला. आता पुन्हा एकदा ' नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटातून ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीत अनेक हिट चित्रपट दिले. मात्र एका दत्तक प्रकरणामुळे त्यांना फार मनस्ताप सहन करावा लागला होता.
सचिन आणि सुप्रिया यांनी श्रियाच्या जन्मा अगोदर त्यांच्या मित्राची मुलगी 'करिश्मा' हिला लहान असताना दत्तक घेतले होते. मात्र त्यांनी मुलं दत्तक घेण्यासाठीची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया केली नव्हती.
करिश्मा हिचे वडील कुलदीप मखनी हे एक हॉटेल व्यावसायिक होते. त्यांच्याच हॉटेलमध्ये करिश्मा आणि सचिन सुप्रियाची पहिली भेट झाल्याचे बोलले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार करिश्मा हिच्या आईची तब्बेत ठीक नसल्याने सुप्रिया यांनी तिचा सांभाळ करायचा निर्णय घेतला.
सचिन आणि सुप्रिया करिश्माला 'किट्टू' या टोपण नावाने बोलवत असतं. काही वर्ष करिश्मा सचिन आणि सुप्रियाच्या घरी राहिली. मात्र सचिन यांनी एकद सांगितल्या प्रमाणे किट्टूला अचानक एकदिवस तिचे वडील लंडनल घेऊन गेले. ज्याबाबत त्यांनी सचिन पिळगांवकर यांना कोणतीही कल्पना दिली नाही.
मात्र यानंतर करिश्माच्या कुटुंबाने सचिन आणि सुप्रिया यांच्यावर आरोप लावले की श्रिया हिच्या जन्मानंतर पिळगांवकर कुटुंबाने स्वतः किट्टूला त्यांच्याकडे परत पाठवून दिले.
सचिन पिळगांवकर यांनी 'हाच माझा मार्ग' या आत्मचरित्रात लिहिले की, करिश्मा हिला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे होते म्हणून ती भारतात आली होती. मी तिला लागेल ती मदत केली मात्र तिच्या वागण्यामुळे तिला इन्स्टिट्यूटमधून काढून टाकण्यात आले. तसेच ती घरी राहत असताना तिच्या वागण्याचा श्रियाला सुद्धा त्रास होऊ लागला होता.
सचिन आणि सुप्रिया यांच्यापासून वेगळे झाल्यावर करिश्मा हिने पिळगांवकर कुटुंबावर अनेक आरोप केले होते. करिश्मा ही सध्या लंडन येथे राहत असून तिने अभिनेता विक्रम आचार्य हिच्याशी लग्न केले आहे.
करिश्मा ही आता दोन मुलांची आई असून पती विक्रम हा त्यांच्या कुटुंबाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.