जया बच्चनच्या रागीट स्वभावाबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. सोशल मीडियावर जया बच्चनचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. ज्यामध्ये ती फॅन्स असो किंवा पापाराझींवर संतापलेली दिसली आहे.
जया आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचं नातं सासू सून म्हणून कसं आहे, याबद्दल प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं.
जया बच्चन यांनी खुद्द याबद्दल सांगितलं आहे. त्या म्हणाल्या की, जे माझ्या मनात असतं ते माझ्या ओठांवर असतं. तिच्याकडून चूक झाल्यास मी तिला रागवते आणि तेवढंच प्रेमही करते.
एकदा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात जया बच्चनने सून ऐश्वर्या रायबद्दल असं काही बोलली की, ते ऐकून अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
जया म्हणाल्या होती की, 'मी पुन्हा एकदा सासू होणार आहे. मी एका अतिशय आश्चर्यकारक आणि सुंदर मुलीची सासू होणार आहे. जिच्याकडेदेखील एक सुंदर स्माइल आहे. आय लव्ह यू.'
जया बच्चन यांनी केलेलं कौतुक ऐकून अभिषेक बच्चनसोबत बसलेली ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
जया बच्चन यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ऐश्वर्या जेव्हाही चूक करते तेव्हा मी तिला तोंडावर सांगते. त्याच्या पाठीमागे राजकारण करत नाही.
त्या म्हणाल्या की, त्या आणि ऐश्वर्या घरात खूप मस्ती करतात, गप्पा मारतात. पण ती खूप जास्त ड्रामेटिक होते. त्यामुळे ऐश्वर्याला तिचा आदर कराला हवा.
ऐश्वर्यासाठी जया खूप पजेसिव आहे. त्यामुळे एकदा पापाराझीने अभिनेत्रीला ऐश म्हटलं तेव्हा जया बच्चन चिडल्या होत्या.