बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते सनी देओल आणि बॉबी देओल सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय आहेत.
त्यांच्यासोबतच त्यांचे वडील आणि बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र देखील सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अभिनय क्षेत्रापासून स्वतःला थोडं दूर ठेवलं असलं तरी, सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेहमी चाहत्यांशी जोडलेले राहतात.
अलीकडेच धर्मेंद्र यांचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये ते सुंदर निसर्गरम्य वातावरणात स्वतः बोट चालवत असल्याचं दिसतं.
या व्हिडीओला कॅप्शनही दिले आहे - 'मित्रांनो, बिक्रमची त्याच्या नौकेत भेट झाली. फार प्रेमळ व्यक्ती आहे ही! एक रोमांचक आणि आनंददायी प्रवास अनुभवता आला.'
89 व्या वयात धर्मेंद्र यांना बोट चालवताना पाहणं, त्यांच्या चाहत्यांसाठी एक प्रेरणादायक आणि आनंददायक क्षण ठरला आहे.
या व्हिडीओवर अनेकांनी प्रेमळ प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले- 'पाजी, तुम्ही असेच आनंद घेत राहा, तुम्हाला पाहून खूप छान वाटतं'.
मागील वर्षी धर्मेंद्र 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात झळकले. ज्यामध्ये त्यांनी शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्यासोबत काम केलं होतं.