...अन् अभिनेत्रीसाठी धर्मेद्र यांनी सुभाष घईंना लगावली होती कानाखाली

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आपल्या अभिनयासह रागिष्ट स्वभावासाठीही ओळखले जातात.

एकदा तर हेमा मालिनी यांच्यासाठी धर्मेंद्र यांनी सुभाष घई यांच्या कानाखाली लगावली होती.

धर्मेंद्र यांचा संतापाचा पारा इतका चढला होता की, त्यांनी सुभाष घई यांना एकमागोमाग एक कानशिलात लगावल्या होत्या.

'क्रोधी' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान हा प्रकार घडला होता. सुभाष घई यांनी हेमा मालिनी यांना बिकिनी घालण्यास सांगितलं होतं.

यावर हेमा मालिनी यांनी नकार दिला होता. मी एक वेळ रिविलिंग ड्रेस घालेन पण बिकीनी नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

पण सुभाष घई ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते वारंवार हेमा मालिनी यांना बिकिनी घालण्यास सांगत होते.

धर्मेंद्र यांना जेव्हा माहिती मिळाली तेव्हा ते प्रचंड संतापले होते.

यामुळेच संतापलेल्या धर्मेंद्र यांनी सुभाष घई यांना मारहाण केली होती.

VIEW ALL

Read Next Story