आमिर खानचं मूळगाव कोणतं? कुठे गेलं बालपण?

Pooja Pawar
Mar 16,2025


बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान याने नुकताच त्याचा 60 वा वाढदिवस साजरा केला.


वाढदिवसाच्या निमित्ताने आमिर खानने त्याची गर्लफ्रेंड गौरी हिला आपल्या कुटुंबाशी इंट्रोड्यूस केलं आणि सांगितलं की तो मागील दीड वर्षांपासून तिच्या सोबत आहे.


आमिर खानचं मूळगाव कोणतं याबाबत खूप कमी जणांना ठाऊक आहे.


उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील शाहबाद येथे आमिर खानचं मूळगाव आहे. हरदोई पासून 40 किलोमीटर लांब असलेल्या शाहबाद येथे आमिरचं गाव आहे.


आमिर खानचं गावातील जुनं घर आता खंडर बनलं आहे. आमिरचा जन्म हा 14 मार्च 1965 रोजी मुंबईत झाला होता.


आमिर खानने काही वर्षांपूर्वी पीएम मोदींच्या संसद आदर्श ग्राम योजनेशी प्रेरित होऊन त्याचं मूळगाव शाहबाद ला दत्तक घेण्याचं ठरवलं होतं.


आमिर PK चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जेव्हा काशी येथे पोहोचला तेव्हा तो आपलं गाव दत्तक घेण्याबाबत बोलला होता.

VIEW ALL

Read Next Story