शाहरुख सेटवर सिगारेट ओढत असताना पाकिस्तानी अभिनेत्याने विचारलं अन्... पुढे जे घडलं ते भन्नाटच!

Intern
Apr 10,2025


बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आज कोणाला माहिती नाही असा क्वचितच कोणी असेल.


जगभरात त्याचे करोडो चाहते आहेत. मात्र, शाहरुख खानची एक सवय अत्यंत वाईट आहे, ती म्हणजे तो खूप सिगारेट ओढतो.


शाहरुखच्या या सवयीबद्दल एक किस्सा त्याच्यासोबत काम केलेल्या पाकिस्तानी अभिनेता जावेद शेखने शेअर केला आहे.


ही घटना 'ओम शांती ओम' या चित्रपटाच्या सेटवरील आहे. ज्यामध्ये जावेद शेख याने शाहरुखच्या वडिलांची भूमिका साकारली होती.


सेटवर दोन गोष्टींना परवानगी नव्हती - फोटो काढणे आणि धूम्रपान करणे. मी स्वतःही सिगारेट ओढतो, पण मी त्यावेळेस सेटच्या बाहेर जाऊन ओढत असे.


एक दिवस मी शाहरुखला सेटवर सिगारेट ओढताना पाहिलं. एक व्यक्ती त्याच्यासाठी टेबल लावत होता, टेबलावर अ‍ॅशट्रे आणि ब्लॅक कॉफी होती. शाहरुखने सिगारेट पेटवली आणि निवांतपणे कॉफी पित होता


मी त्याला विचारलं, 'मीही सिगारेट ओढतो, पण मी बाहेर जाऊन ओढतो. तू इथेच कसा ओढतोस? इथे तर धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे'.


त्यावर शाहरुखने हसत खुर्ची मागवली आणि अ‍ॅशट्रे जावेदकडे वळवत म्हणाला, 'माझ्यासोबत बसा. इथेच प्या.'


शाहरुखने आपल्या टीमला सांगितलं आणि लगेच जावेद शेखसाठी टेबल लावण्यात आले. कॉफी आणि सिगारेटही आली.


जावेद म्हणाला, त्या दिवशी मीही पहिल्यांदाच सेटवर बसून सिगारेट ओढली.


जरी शाहरुखचा हा किस्सा गमतीशीर वाटत असला तरी धूम्रपान हे आरोग्यास अत्यंत घातक आहे.

VIEW ALL

Read Next Story