जीत अदानी अदानी समूहात Vice President

जीत अदानी 2019 पासून अदानी समूहाशी जोडला असून, वडिलांना व्यवसायात मदत करत आहे. 2022 मध्ये त्याला अदानी समूहात Vice President म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.

जीत अदानी अदानींचा छोटा मुलगा

गौतम अदानी यांना दोन मुलं आहे. मोठ्या मुलाचं नाव करण अदानी आहे. तर जीत अदानी हा त्यांचा छोटा मुलगा आहे. जीत अदानीने युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनियामधून शिक्षण घेतलं आहे.

परदेशात भेट

रिपोर्ट्सनुसार, जीत परदेशात शिक्षण घेत असताना दिवाशी त्याची भेट झाली होती. यानंतर दोघांची मैत्री आणि त्याचं प्रेमात रुपांतर झालं.

12 मार्चला साखरपुडा

12 मार्चला कोणताही गाजावाजा न करता काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचा साखरपुडा झाला. दोघांच्या साखरपुड्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिवा आणि जीत यांची आधीपासून ओळख

दीवा आणि जीत फार काळापासून एकमेकांना ओळखतात. आता दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

दिवा हिरे व्यापाऱ्याची मुलगी

दिवा हिरे व्यापारी जैमीन शाह यांची मुलगी आहे. त्यांची कंपनी C.Dinesh & Co. Pvt. Ltd चं डायमंड मार्केटमध्ये मोठं नाव आहे.

दिवा आणि जीत यांच्या भेटीचा किस्सा रंजक

अदानी कुटुंबाचा भाग होण्यास तयार असणारी दिवा आणि जीत यांच्या भेटीचा किस्साही रंजक आहे.

गौतम अदानी यांच्या घऱात सनई चौघडे

गौतम अदानी यांच्या घऱात पुन्हा एकदा लग्नाची तयारी सुरु झाली आहे. गौतम अदानी यांचा लहान मुलगी जीत अदानीचा नुकताच दिवा शाहसोबत साखरपुडा झाला आहे.

VIEW ALL

Read Next Story