स्टारकिड्स पासून बॉलिवूड स्टार्स पर्यंत आणि शुभमन गिल पासून नीता अंबानींपर्यंत सर्वांसोबत हजर असणारा हा Orry नक्की कोण आहे असा प्रश्न बऱ्याच महिन्यांपासून नेटकऱ्यांना पडला.

Orry नावाने प्रसिद्ध असलेला ओरहान अवत्रामणी हा एक सोशल मीडिया स्टार, फॅशन आयकॉन, ट्रॅवलर आणि जान्हवी कपूर, सारा अली खान, न्यासा देवगण, खुशी कपूर आणि इतर सारख्या बॉलीवूडच्या प्रत्येक पुढच्या पिढीतील स्टार्सचा बेस्टी आहे.

371K च्या Instagram फॉलोअरसह, Orry लग्जरीयस जीवन जगतो. महागड्या वॉर्डरोबपासून ते चकचकीत गाड्यांपर्यंत, तो नेहमीच आपली छाप पडताना दिसतो त्याचसोबत तो एक स्वयंघोषित फॅशन आयकॉनही आहे.

ऑगस्ट 1999 मध्ये जन्मलेला ओरहान अवत्रामणी हा जोर्ज आणि शहनाज अवत्रामणी यांचा मुलगा आहे. त्याचा जन्म मुंबईत झाला पण त्यांनी न्यूयॉर्कमधून कम्युनिकेशन डिझाइनमध्ये ललित कला शाखेची पदवी घेतली. त्यानंतर तो कोलंबिया विद्यापीठात गेला जिथे तो सारा अली खानचा वर्गमित्र होता.

जेव्हा जान्हवी कपूरने Orry ला डेट करण्याच्या अफवांचे खंडन केले तेव्हा तिने उघड केले की ते दोघेही बालपणीचे मित्र आहेत. रिपोर्ट्सनुसार, Orry, जान्हवी, न्यासा आणि खुशी त्यांच्या लहानपणी एकाच मित्र मंडळाचा भाग होते.

ओरहान अवत्रामणीच्या LinkedIn प्रोफाइलनुसार, त्याने 2017 मध्ये Reliance Industries Limited येथे विशेष प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. परंतु Cosmopolitan India ला दिलेल्या मुलाखतीत तो “गायक, गीतकार, फॅशन डिझायनर” असल्याचे उघड झाले. तो टॉम फोर्ड, बॅलेन्सियागा, अमिरी आणि इतर सारख्या अनेक लक्झरी ब्रँडशी देखील संबंधित आहे.

एका मुलाखतीत ओरहानने खुलासा केला की, त्याने एकदा काइली जेनरसोबत त्याचा वाढदिवस तिच्या घरी साजरा केला होता. तो म्हणाला, 'जर तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीसोबतचा एक फोटो म्हणाल ज्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले, तर होय, मी माझ्या वाढदिवसासाठी काइली जेनरच्या घरी गेलो होतो आणि आम्ही एकत्र एक चिफोटो काढलेला पोस्ट केल्यानंतर त्याने बऱ्याच लोकांचे लक्ष वेधले.'

VIEW ALL

Read Next Story