भारतीय क्रिकेटर्सची संपत्ती अफाट आहे. दरवर्षी ते किती कर भारतात त्यावरूनही चर्चा होते.
आजवर तुम्हाला वाटत असेल की क्रिकेटचे दिग्ग्ज सचिन, विराट आणि धोनीपैकी कोणी तरी एकजण रतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू असेल. पण तसे नाही.
पण आपण ज्या भारतीय क्रिकेटपटूबद्दल बोलत आहोत त्याला सुमारे 34000 कोटी रुपयांची मालमत्ता वारशाने मिळाली आहे.
हा क्रिकेटपटू आहे बडोद्याच्या राजघराण्यातील समरजीत सिंग गायकवाड! समरजीत सिंग गायकवाड हे जगातील सर्वात मोठ्या खाजगी हवेली, लक्ष्मी विलास पॅलेसचे मालक आहेत.
क्रिकेटमध्ये, समरजीत सिंग हे एक टॉप-ऑर्डर फलंदाज होते आणि 1987 ते 1989 दरम्यान बडोद्यासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहेत.
त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये बडोद्यासाठी सहा प्रथम श्रेणी सामने खेळले आणि नंतर ते बडोदा क्रिकेट असोसिएशन (BCA) चे अध्यक्ष बनले.
त्यांना 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता वारशाने मिळाली आहे.