प्रेम चोप्रा यांनी त्याच्या नकारात्मक भूमिकाद्वारे कायम प्रेक्षकांवर आपली छाप पाडली आहे.
तुम्हाला माहितीय का प्रेम चोप्रा यांच्या जावई कोण आहे. तो एक अभिनेता असून त्याचा दोन चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रुपयांचा गल्ला ओलांडला आहे.
हा अभिनेता आहे 3 इडियट्स, फेरारी की सवारी आणि स्टाइल यासारख्या चित्रपटातून प्रसिद्ध झालेला शर्मन जोशी.
शर्मन जोशीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या पत्नीचं नाव प्रेरणा चोप्रा आहे. दोन मुलं आहेत.
शर्मन जोशीची बहीण देखील मनोरंजनाशी जोडली आहे. तिने अनेक टीव्ही मालिकांसह आणि चित्रपटात काम केलं आहे. तिचं नाव आहे मानसी जोशी रॉय.
शर्मन आणि प्रेरणाची प्रेम कहाणी कॉलेजमध्ये सुरु झाली. खास म्हणजे या दोघांना एकमेकांना प्रपोज करण्याची गरज वाटली नाही.
त्यांच्या लग्नाला दोन्ही घराने लगेचच परवानगी दिली. 15 जून 2000 मध्ये त्यांनी गुजराती रीतीरिवाजांनुसार लग्न केलं.