सुशांतच्या घरी अदा शर्माने का ठेवलं नाही फर्निचर?

Pooja Pawar
Oct 22,2024


बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा ही सध्या मुंबईतील त्या घरात राहते जिथे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपले जीवन संपवले.


14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील घरी आत्महत्या केली होती.


अभिनेता सुशांत मुंबईतील बांद्रा वेस्ट येथील माॅन्ट ब्लँक बिल्डिंगमध्ये सी फेसिंग अपार्टमेंटमध्ये राहायचे.


सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर अनेक वर्ष ते घर खाली होते. त्या घराला कोणीही विकत घ्यायला तयार नव्हते.


परंतु अभिनेत्री अदा शर्माने काही महिन्यांपूर्वी हे घर भाड्यावर घेतले आणि आता ती आई आणि आजी सोबत येथे राहते.

अदा घरात फर्निचर ठेवत नाही :

अदाने एका मुलाखतीत सांगितले होते की तिने सुशांत राहत असलेल्या घरात फर्निचर ठेवलेलं नाही.


अदा शर्मा म्हणाली की सध्या राहत असलेल्या घरातच नाही तर यापूर्वी देखील ती राहत असलेल्या घरामध्ये फर्निचर नव्हते.


अदा शर्मा हिला डान्स करायला खूप आवडतो.


अदाने सांगितले तिला डान्सची आवड आहे. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा ती घरी डान्स करते.


डान्स करत असताना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून अदा हिने घरात फर्निचर ठेवलेलं नाही.

VIEW ALL

Read Next Story