करण जोहरने अचानक वजन का कमी केले? अखेर कारण समोर

Intern
Apr 18,2025


बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर 52 वर्षांचा असूनही आजही अत्यंत फिट आणि अॅक्टिव्ह आहे.


करण जोहरने नुकतेच आपले वजन भरपूर प्रमाणात कमी केले आहे. त्याच्या या बदलावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत.


वजन कमी झाल्यानंतर जेव्हा तो पापाराझींमधून सार्वजनिक ठिकाणी दिसला, तेव्हा अनेक चाहत्यांनी त्याचे व्हिडीओ पाहून चिंता व्यक्त केली. कारण तो पूर्वीपेक्षा खूपच बारिक आणि वेगळा दिसू लागला होता.


करणने स्वतः एका पॉडकास्टमध्ये आपल्या वजन कमी करण्यामागचं कारण सांगितलं आहे. त्याने स्पष्टपणे कबूल केलं की, तो पूर्वी अजिबात फिट नव्हता.


17 एप्रिल रोजी करण जोहर इन्स्टाग्रामवर लाईव्ह येऊन आपल्या तब्येतीबाबत सांगताना म्हणाला की, त्याने नुकतीच एक रक्त तपासणी केली होती आणि त्या तपासणीत रक्ताची लेव्हल बरोबर नसल्याचं दिसलं. त्यामुळे त्याने आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहण्याचा निर्णय घेतला.


फक्त रक्तातील पातळी सुधारण्यावर न थांबता, करणने आपले वजनही कमी करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने डायटिंगला सुरुवात केली. त्याच्या म्हणण्यानुसार, तो सध्या दिवसातून फक्त एकदाच जेवतो आणि यामुळे त्याला वजन कमी करण्यास मदत झाली.


फक्त रक्तातील पातळी सुधारण्यावर न थांबता, करणने आपले वजनही कमी करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने डायटिंगला सुरुवात केली. त्याच्या म्हणण्यानुसार, तो सध्या दिवसातून फक्त एकदाच जेवतो आणि यामुळे त्याला वजन कमी करण्यास मदत झाली.


याशिवाय करणने पोहणे आणि पॅडल बॉल खेळणे सुरू केले. ज्याचा त्याला खूप फायदा झाला. हळूहळू त्याचे वजन कमी होऊ लागले आणि तो स्वतःला अधिक हलकं आणि उत्साही वाटू लागले.


याआधीही आयफा अ‍ॅवॉर्ड्स कार्यक्रमात त्याने सांगितले होते की, तो केवळ सौंदर्य किंवा लुक्ससाठी नव्हे, तर निरोगी राहण्यासाठी हे सगळं करत आहे. करण म्हणतो, 'चांगलं खा, नियमित व्यायाम करा आणि समोरच्याला आपलं व्यक्तिमत्व सकारात्मक आणि प्रेरणादायी वाटलं पाहिजे असे राहा.'

VIEW ALL

Read Next Story