प्रार्थना बेहेरेने मुंबई का सोडली? स्वत:च केला खुलासा

माझी तुझी रेशीमगाठ

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून झळकलेली अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे... प्रार्थना आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

प्रार्थना बेहेरे

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे काही दिवसांपूर्वी अलिबागला राहण्यास गेली होती. त्यांचं कारण देखील तिने नुकतंच सांगितलं आहे.

मुंबई

स्वप्नांची मायानगरी असलेल्या मुंबईला अनेकांना सोडू वाटत नाही. मात्र, प्रार्थना बेहेरेने मोठा निर्णय घेतला अन् अलिबागला शिफ्ट झाली.

अलिबाग

कोविडच्या आधी प्रार्थनाने अलिबागमध्ये जागा घेतली होती. प्रार्थनाच्या नवऱ्याला आठवड्यातले 4 दिवस तिथे जावं लागायचं.

मुंबईत गर्दी

मुंबईत मला खूप गर्दी वाटायची. पण अलिबागमध्ये खूप मोठी जागा होती आणि हिरवळ देखील होती. त्यामुळे आम्ही इथंच राहण्याचा विचार केला, असं प्रार्थना म्हणते.

त्रास झाला पण...

माझे सासू आणि सासरे देखील तयार झाले अन् आम्ही इकडे शिफ्ट झालो. सुरूवातीला थोडा त्रास झाला पण नंतर सवय झाली, असंही प्रार्थनाने म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story