इरफान खान यांना आपल्या नावाची लाज का वाटायची? का बदललेलं नाव?

Intern
May 01,2025

इरफान खान

2020 मध्ये इरफान खान यांचे निधन झाले. आपल्या अप्रतिम अभिनय कौशल्यामुळे ते प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करून गेले.

जगभरात प्रसिद्धी

इरफान यांनी केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे, तर हॉलिवूडमध्ये देखील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही काम केलं. त्यांच्या जाण्यानंतरही प्रेक्षक आजही त्यांच्यावर तितकंच प्रेम करतात.

इरफान खानचं व्यक्तिमत्त्व

त्यांचं व्यक्तिमत्त्व जरी मोकळं आणि साधं असलं, तरी त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी फार कमी लोकांना माहिती आहेत.

त्यांचं मूळ नाव

इरफान खान यांचं पूर्ण नाव होतं 'साहिबजादे इरफान अली खान'. मात्र त्यांनी सगळीकडे फक्त इरफान खान हेच नाव लावले आहे.

नावात बदल का केला?

एका मुलाखतीत इरफान यांनी सांगितलं होतं की त्यांनी त्यांच्या नावातून साहिबजादे हा शब्द का काढून टाकला.


त्यांना या शब्दामुळे एक वेगळी ओळख वाटत होती जी त्यांना आवडत नव्हती.

नावाची लाज वाटू लागली

इरफान यांनी स्पष्टपणे सांगितलं की, साहिबजादा या शब्दामुळे त्यांना लाज वाटायची.


त्यांना एक सामान्य माणूस म्हणून जगायचं होतं. कोणत्याही श्रीमंती किंवा राजघराण्यासारख्या नावाशिवाय. म्हणून त्यांनी त्यांच्या नावातून हा शब्द काढला आणि फक्त 'इरफान' हीच ओळख ठेवली.

VIEW ALL

Read Next Story