अनिल कपूर मागच्या 5 दशकांपासून अभिनयाची छाप पाडत आहे. द नाईट मॅनेजरमधून त्याने ओटीटीवर पदार्पण केले. यात तो व्हिलन आहे.
विजय सेतुपतीने फर्जीमधून ओटीटीवर एन्ट्री घेतली. यात तो पोलीस कर्मचारी दाखवण्यात आला आहे.
सोनाक्षी सिन्हाने दहाडमध्ये महिला पोलिसाची भूमिका बजावली. यातील तिच्या भूमिकेचे कौतुक करण्यात आले.
शाहिद कपूरने 'फर्जी'तून डिजीटल क्षेत्रात पाऊल टाकले. ही सिरिज त्याच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरली.
सोहम शाहने फर्जीमध्ये आपल्या अभिनयाची ताकद दाखवली.
सोहम शाहने तुम्बाडमधून स्वत: सिद्ध केले.
मनोज वाजपेयीने एक बंदा काफी है आणि जोरममधून दमदार पाऊल टाकले.
नवाजुद्दीनने ओटीटीवर पदार्पण करुन हड्डीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावर्षी अभिषेक बॅनर्जी एक चांगला कलाकार म्हणून पुढे आला.
त्याने विविध सिरिजमध्ये सलग चांगले प्रदर्शन केले आहे. आता तो दिग्गजांच्या रांगेत जाऊन बसला आहे.
पंकज त्रिपाठीने ओएमजी-२ मधून अभिनयाची छाप सोडली.