भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षातील चतुर्थी तिथीपासून गणेश चतुर्थी सुरु होते.
गणेशोत्सवादरम्यान, गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. यामध्ये संपूर्ण 11 दिवस बाप्पाची पूजा केली जाते
यावर्षी देखील गणेशोत्सव 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या दिवसांमध्ये असणार आहे.
गणेश चतुर्थीला गणपतीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या वस्तू अर्पण करत असतात.
मात्र, गणपती बाप्पााला दुर्वा का सर्वात जास्त आवडतात हे तुम्हाला माहिती आहे का?
गणपती बाप्पाचे एका राक्षसाशी युद्ध झाले होते. त्यानंतर त्यांचे शरीर खूपच तापले होते.
त्यामुळे गणेशजींच्या शरीराला हिरव्या दुर्वा वाहिल्या जातात. यामुळे थंडावा मिळतो. तेव्हापासून दुर्वा या गणपती बाप्पांना खूप प्रिय झाल्या.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)