उन्हाळा आला की पुदिना लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग बनतो. पुदिन्याची पाने ही औषधी असतात.
दररोज रिकाम्या पोटी पुदिन्याची पाने खाल्ल्याने अनेक फायदे होतात.
पुदिन्याची पाने जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात असतात. ही पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
दररोज 5 पुदिन्याची पाने खाल्ल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात असे आयुर्वेद आणि पचनतज्ज्ञांचे मत आहे.
पुदिन्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे त्वचेला नुकसान करणाऱ्या मुक्त रॅडिकल्सशी लढण्यासाठी मदत करते.
पुदिना पोट निरोगी ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे. पुदिन्याची पाने चावल्याने अन्नाचे पचन चांगले होते, ज्यामुळे पोटफुगीची समस्या उद्भवत नाही.
रिकाम्या पोटी पुदिन्याची पाने खाल्ल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि वजन कमी होऊ लागते.
जर तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल, तर पुदिन्याची पाने चावल्याने तुमचा श्वास ताजा राहील.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)