काळ्या आणि घनदाट भुवयांसाठी 5 सोप्या आणि प्रभावी टिप्स

Intern
Mar 27,2025


काळ्या आणि जाड भुवया तुमची सुंदरता अजून वाढवतात. मात्र, अनेकजणांना पातळ भुवयांच्या समस्या असतात.


या काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही तुमच्या पातळ भुवया घनदाट आणि सुंदर बनवू शकता.

1. एरंडेल तेल

एरंडेल तेल भुवयांच्या केसांची वाढ करते. यामध्ये विटामिन E आणि फॅटी अ‍ॅसिड्स असतात, जे केसांच्या वाढीस मदत करतात.

2. ऑलिव्ह तेल

ऑलिव्ह तेल भुवयांसाठी खूप फायदेशीर असते. यामुळे भुवयांचे केस मजबूत आणि दाट होतात.

3. कोरफडीचा गर

कोरफड केसांना पोषण देते आणि भुवयांच्या केसांची वाढ करते. त्यामुळे भुवयांवर कोरफडीचा गर लावणे फायद्याचे ठरते.

4. व्हिटॅमिन E कॅप्सूल

व्हिटॅमिन E भुवयांच्या केसांचे आरोग्य सुधारते आणि त्यांची वाढ करण्यास मदत करते.

5. कांद्याचा रस

कांद्याचा रस भुवयांची वाढ करतो. कारण त्यात सल्फर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे केसांना मजबूत बनवतात.


या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या भुवयांना घनदाट आणि सुंदर बनवू शकता.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story