आजच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना वजन वाढण्याची समस्या उद्भवू लागली आहे.
अशा वेळेस लोक चुकीच्या डायटिंग पद्धतींचा वापर करतात. जे आरोग्यास धोकादायक ठरू शकते.
हे 5 ड्रिंक्स तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. या ड्रिंक्समुळे तुमचे वजन लवकर कमी होण्यास मदत होईल.
आले आणि लिंबामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे वजन कमी करण्यास मदत करतात.
जीऱ्याचं पाणी वजन कमी करण्यासाठी योग्य उपाय ठरू शकतो. या ड्रिंकमुळे मेटाबॉलिझम सक्रिय राहतो आणि पचनक्रिया सुधारते.
दालचिनी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे रक्तातील ग्लुकोज नियंत्रित करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते.
आजकाल वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स खूप लोकप्रिय झाले आहेत. हे शरीरातील फायबरची कमतरता पूर्ण करतात.
आवळा आणि आल्याच्या रसात अनेक पोषकतत्त्व असतात. जे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. हे पेय वजन कमी करण्यास खूप फायदेशीर आहे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)