रोज 1 सफरचंद खाण्याचे 7 फायदे

Aug 27,2024


सफरचंदमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फायबर, पोटॅशियम इतर आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे अँटीऑक्सिडंट्स इत्यादी पोषक तत्वांनी समृद्ध सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं.


डॉक्टर पण म्हणतात की दररोज एक सफरचंद खाल्ल्याने हॉस्पिटलची पायरी चढावी लागणार नाही. दररोज एक सफरचंद खाल्याने 7 फायदे होतात. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.


फायबर युक्त सफरचंद रोज खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. बद्धकोष्ठता, अपचन, अ‍ॅसिडिटी इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.


सरफचंदमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.


व्हिटॅमिन ए सफरचंदमध्ये असल्याने आरोग्य तज्ज्ञांच्या मते सफरचंद खाल्ल्याने दृष्टी सुधारते.


सरफचंदमधील पोषक तत्त्वामुळे थकवा आणि अशक्तपणा यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.


सफरचंद खाल्ल्यामुळे त्वचेसाठीही फायदेशीर आहे. अँटिऑक्सिडंट्स असतात जे त्वचेसाठी उपयुक्त ठरते.


रोज एक सफरचंद खाल्ल्याने हृदयाच आरोग्य निरोगी राहतं. यात असलेलं पोटॅशियम मुबलक प्रमाणात असल्याने रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं.


व्हिटॅमिन सी आणि लोहयुक्त सफरचंद खाल्ल्याने रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत मिळते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story