खजूर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. खजूरमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते, जे आपल्या हाडांसाठी फायदेशीर आहे.
खजूरमध्ये कोलेस्ट्रॉल आणि साखरेचे प्रमाण कमी असते. शुद्ध हृदय चांगले राहते. साखरेचे प्रमाण कमी असणे हे देखील फायदेशीर आहे. त्यामुळे खजूर तुम्ही जास्त प्रमाणात खाऊ शकता.
आयुर्वेदानुसार खजूर एक औषध असून यामुळे अनेक रोगांचे उपाय केले जातात. शारिरिक कमजोरी, शरीरात रक्ताची कमी किंवा हृदयरोग, जास्त तहान लागण्याची समस्या या सर्वांवर खजूर फायदेशीर ठरू शकते.
खजूरमध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनोईड्स, फिनोलिक अॅसिड असतात. यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. खजूरमध्ये जीवनसत्वे आणि आणि खनिजे आढळतात. त्याचा आपल्या त्वचेला फायदा होतो.
दररोज सकाळी 2 खजूर खाल्ल्या तर त्याचा काही दिवसांत त्याच्या शरीरावर प्रचंड परिणाम दिसून येतो. खजूर खाल्लाने थकवा येत नाही.
खजूरमध्ये आयर्नची मात्रा असते. आयर्नची कमी मात्रा शरीराला कारणीभूत असते. ज्यामुळे छोटा श्वास, एनीमिया, दमणं अशी लक्षणं जाणवतात. रक्त स्वच्छ करण्यात देखील तुम्हाला मदत करतात.
खजूर मानसिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. मेंदूतील प्लेक रोखण्यासाठी खजूर खूप उपयुक्त ठरतात. खजुराचे ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो. खजूर रक्त वाढवण्याचे काम करते. अॅनिमियामध्ये खजूर खाल्ल्याने आराम मिळतो.