आयुर्वेदानुसार लिंबू पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषत म्हणजे उन्हाळ्यात लिंबूपाण्याचे सेवन आवर्जून केले पाहिजे.
सकाळी उपाशी पोटी लिंबूपाणी प्यायल्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. तर याचे सविस्तर फायदे जाणून घेऊया.
उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होण्याची शक्यता जास्त असते. लिंबूपाणी पिण्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहते आणि डिहायड्रेशन टाळता येते.
जर पचनासंबंधित त्रास असेल. तर लिंबूपाणी फायदेशीर ठरते. यामुळे गॅसेस, अपचन, जडपणा यापासून आराम मिळतो.
लिंबामध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. लिंबू त्वचेसाठी फायदेशीर असतो. त्यामुळे त्वचा उजळ, तजेलदार आणि निरोगी बनते.
लिंबातील व्हिटॅमिन C शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे सर्दी, ताप यांसारख्या आजारांपासून संरक्षण मिळते.
लिंबूपाणी पिण्यामुळे यकृतातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातली घाण बाहेर जाते आणि आरोग्य चांगले राहते.
सकाळी उपाशीपोटी लिंबूपाणी प्यायल्यास शरीर दिवसभर उत्साही आणि ताजेतवाने राहते.
लिंबूपाणी तोंडातील जंतू नष्ट करण्याचे काम करते. यामुळे तोंडाला येणारी दुर्गंधी टाळता येते आणि तोंड स्वच्छ राहते.
लिंबूपाणी बनवताना शक्यतो साखर टाळावी आणि मध किंवा मीठ घालून सेवन केल्यास अधिक फायदेशीर ठरते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)