लंच ब्रेकनंतर ऑफिसमध्ये झोप येते? 'या' 7 सोप्या टिप्स करा फॉलो
लंचनंतर अनेक वेळा शरीरात आळस येतो आणि झोप येऊ लागते. जर तुम्हालाही हा त्रास होत असेल, तर या टिप्स वापरून बघा. यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहाल.
लंचनंतर एकाच जागी बसल्यामुळे आळस वाढतो. थोडावेळ चालण्याचा प्रयत्न करा. यामुळे झोप कमी होईल.
लंचनंतर चहा किंवा कॉफी घेतल्याने झोप उडण्यास मदत होते.
दिवसभर ऊर्जा टिकवण्यासाठी दररोज 7-8 तासांची शांत झोप घेणे महत्त्वाचे आहे.
मसालेदार किंवा जड अन्नामुळे शरीर आळसावते. दुपारी हलके आणि पचनास सोपे अन्न खाण्याचा प्रयत्न करा.
खूप झोप येत असेल तर चेहऱ्यावर थंड पाणी मारल्याने झोप तात्काळ उडते.
शरीर हायड्रेट ठेवल्याने थकवा कमी होतो आणि तुम्ही उत्साही वाटते.
शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. लोहयुक्त आणि पोषणमूल्य असलेले अन्न खाल्ल्याने सतत येणारी झोप कमी होऊ शकते. (Disclaimer- वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )