वयोमानानुसार एका दिवसात किती तास झोपावं?

Sayali Patil
May 01,2025

4 ते 11 महिने

लहान मुल, 4 ते 11 महिन्यांचं असल्यास त्यानं 12 ते 15 तासांची झोप घेणं अपेक्षित आहे. एक ते दोन वर्षांच्या मुलांनी दिवसभरात 14 तासांची झोप घ्यावी.

3 ते 4 वर्षे

3 ते 4 वर्षे वयाच्या मुलांनी 11 तासांची झोप घ्यावी. तर, 6 ते 13 वर्षांमधील व्यक्तीसाठी 10 तासांची झोप आवश्यक आहे.

14 ते 17 वर्षे

14 ते 17 वर्षांच्या वयामध्ये 8 ते 10 तासांची झोप आवश्यक आहे. तर, 18 वर्षांहून अधिक वय असणाऱ्य़ांनी दिवसभरात 8 ते 9 तास झोपावं.

निरोगी आयुष्य

निरोगी आयुष्यासाठी दर दिवशी किमान 8 तासांची झोप गरजेची असते. वय वाढत जातं त्यानुसार उतारवयात झोपेचं प्रमाण कमी होतं.

वृद्ध

परिणामी वृद्धांनी किमान 7 ते 8 तासांची झोप घ्यावी. झोपेमुळं शरीर आणि मेंदू सुदृढ राहण्यास मदत होते.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story