आपल्या शरीरातील केस, डोळे, स्नायू, त्वचा, हार्मोन्स आणि पेशींच्या आरोग्यासाठी प्रोटीन्सची अर्थात प्रथिनांची मोठी मदत होते. शरीराला याच प्रोटीनची कमतरता भासू नये म्हणून दररोज आहारात त्यांचा समावेश करणं आवश्यक आहे.
जाणून घ्या अशा शाकाहारी पदार्थांविषयी जी तुम्हाला मांसाहारी पदार्थांपेक्षाही अधित प्रथिनं पुरवू शकतात.
सोयाबीन हे शाकाहारी आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन असतात आणि त्यात जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स देखील असतात.
टोफूला अनेकदा कॉटेज चीज किंवा पनीरचा पर्याय म्हणूनही वापरलं जातं. हे सोयामिल्क गोठवून तयार केले जाते. जिथं प्राथमिक टप्प्यात दुधाचे दही बनते. नंतर ते वेगवेगळ्या आकारात पांढर्या ब्लॉक्समध्ये त्यावर दाब दिला जातो. यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि जस्त पोषक तत्वांचा भरणा असतो.
केवळ प्रोटीनच नाही तर लोह, फायबर आणि फोलेट देखील मसूरमध्ये भरपूर प्रमाणात आढळतात.
राजमा किंवा किडनी बीन हा उत्तर भारतातील नियमित आहारातील अविभाज्य भाग आहे. त्यात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह सारखी आवश्यक खनिजे देखील आहेत.
क्विनोआ एक संपूर्ण पदार्थ प्रोटीनने परिपूर्ण आहे, ज्यामध्ये सर्व आवश्यक अमीनो ऍसिड असतात, ते फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मॅंगनीजचा एक चांगला स्त्रोत देखील आहे.
चिया सीड्स प्रोटीन, ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहेत.
ड्राय फ्रुटस अर्थात सुक्यामेव्यामध्ये प्रोटीन आणि फॅट्सचे प्रमाण जास्त असते. म्हणून बदाम, काजू आणि अक्रोडचे सेवन फायद्याचे.
पीनट बटर देखील प्रोटीनचा एक चांगला स्रोत असून मांसाहाराला चांगला पर्याय आहे. विशेषतः जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रोटीन आणि फायबरच्या दर्जा पूर्ण करायच्या असेल तेव्हा पीनट बटर खावं.