कडुलिंब ही एक अशी औषधी वनस्पती आहे, ज्याच्या पानांपासून ते देठ, सालीपर्यंत सर्वच भाग आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
शरीर निरोगी ठेवण्यासाठी सकाळी तोंड न धुता कडुलिंबाची पाने चावून खाणे फायदेशीर असते.
दातांच्या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी तोंड न धुता 3 ते 4 कडुलिंबाची पाने चावून खा. यामुळे दात आणि हिरड्यांचे आरो
कडुलिंबाची पाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करतात. मधुमेह असलेल्या रुग्णांना विशेष फायदा होऊ शकतो.
कडुलिंबाची पाने पचनसंस्था मजबूत ठेवण्यास मदत करतात. तसेच बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगणं यांसारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.
कडुलिंबाची पाने यकृत निरोगी ठेवण्यात मदत करतात. ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करतात आणि यकृताचे कार्य सुधारतात.
कडुलिंबामध्ये प्रथिने, कॅल्शियम, व्हिटामिन C, फायबर, कार्बोहायड्रेट, चरबी, अमिनो अॅसिड, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.