धावपळीच्या जीवनात आजार नियंत्रणात ठेवणारं हे फळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जात.किवीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत जे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात.
जाणून घ्या रोज किवी खाण्याचे 8 जबरदस्त फायदे
किवी हे कमी कॅलरीज असणारे पौष्टिक फळ आहे. कीवीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते.
किवी हे हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरते.
किवीचे सेवन केल्याने त्वचा चमकदार होते आणि चेहऱ्यावरील सुरकूत्या निघून जातात.
किवी खाल्ल्याने विषारी पदार्थ काढण्यास मदत होते.
पोटातील अल्सर किंवा उष्णता बाहेर काढण्यास मदत करते.
किवीमध्ये भरपूर प्रमामात लोह आणि फॉलिक अॅसिड असते.जे गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
किवीचे सेवन केल्याने शरीरातील ग्लूकोजचे प्रमाण कमी होते ज्यामुळे डायबिटिड कंट्रोलमध्ये राहते.
किवी खाल्ल्याने मानसिक ताणतणाव कमी होतो.