अक्रोड खाणे अनेकांना आवडते आणि रोज अक्रोडच्या सेवनाने शरीर मजबूत होते.
अक्रोड खाण्याचे अनेक फायदे आहेत जसे की, थायरॉईड, हाडं, रक्तदाब यांपासून आराम मिळू शकतो.
बहुतांश लोक अक्रोड खाल्ल्यानंतर त्याचं साल कचऱ्यात फेकून देतात. पण या सालीचा योग्य वापर केल्यास अनेक फायदे होऊ शकतात.
अक्रोडच्या सालीचा उपयोग खत म्हणून केला जाऊ शकतो, ज्यामुळे झाडांना आणि रोपटांना आवश्यक पोषण मिळते.
तुम्ही अक्रोडच्या सालांपासून घर सजवण्यासाठी सुंदर शुशोभिकरणाच्या वस्तू तयार करू शकता. यामुळे तुमच्या घराची शोभा आणखी वाढेल.
अक्रोडच्या सालीची पावडर करून, त्याचा फेस पॅक तयार करावा. यामुळे त्वचा मुलायम होईल.
जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर अक्रोडच्या सालीची पेस्ट तयार करून ती चेहऱ्यावर लावा. यामुळे तेलकटपणा कमी होईल.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)