रोज लिपस्टिक लावल्याने होतंय मोठं नुकसान; आताच थांबवा वापर

Intern
Mar 29,2025


रोज लिपस्टिक लावल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात.


हे दुष्परिणाम ओठांच्या त्वचेसाठी धोकादायक ठरू शकतात.


पाहूयात, रोज लिपस्टिक लावल्याने कोणकोणते नुकसान होऊ शकते.

1. ओठ सुकणे आणि सालं निघणे

रोज लिपस्टिक लावल्याने ओठांचं नॅचरल मॉइश्चर जातं. ज्यामुळे ओठ सुकतात आणि त्याची सालं निघू लागतात.

2. धोकादायक रसायन

लिपस्टिकमध्ये अनेक वेळा रसायनांचा समावेश असतो, जो त्वचेला धोका पोहोचवू शकतो.

3. ओठांचा रंग

लिपस्टिकचा नियमित वापर ओठांचा रंग काळा होण्यास कारणीभूत ठरू शकतो.

4. अ‍ॅलर्जीचा धोका

काही लोकांना लिपस्टिकमधील रसायनांपासून अ‍ॅलर्जी होऊ शकते. ज्यामुळे ओठांवर जळजळ आणि खाज सुटू शकते.

5. पोटात जाण्याचा धोका

खाण्यापिण्याच्या वेळी लिपस्टिक पोटात जाते. जी आरोग्य समस्यांना कारणीभूत होऊ शकतो.

6. ओठांची संवेदनशीलता वाढणे

लिपस्टिकच्या वापरामुळे ओठांची संवेदनशीलता वाढू शकते, ज्यामुळे इजा होऊ शकते आणि फोड येण्याची शक्यता असू शकते.

7. नैसर्गिक किंवा हर्बल लिपस्टिकचा फायदा

नैसर्गिक किंवा हर्बल लिपस्टिक वापरल्याने ओठ मऊ राहतात आणि सुंदर दिसू लागतात.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story