बदाम आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणूनच आपल्या आहारात बदामांचा समावेश असावा.
काही लोक चुकीच्या पद्धतीने बदाम खातात, ज्यामुळे त्यांना शारीरिक नुकसान होऊ शकते.
बदाम नेहमी भिजवून खावेत. भिजवलेले बदाम आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात.
रोज सकाळी 5-6 भिजवलेले बदाम साल काढून खावेत.
रोज भिजवलेले बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते.
शरीरात हिमोग्लोबिन वाढण्यास देखील भिजवलेले बदाम मदत करतात.
तुम्ही या योग्य पद्धतीने बदाम खाल्ल्यास त्याचे अधिक फायदे मिळवू शकता.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)