अनेकांना तोंडात वारंवार अल्सर होण्याची समस्या भेडसावत असते. या अल्सरमुळे खाणं-पिणंही त्रासदायक होतं.
जर तुम्हीही या त्रासाला सामोरे जात असाल, तर काही घरगुती उपायांमुळे तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो.
मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने अल्सरमधील जंतू मरतात आणि बरे होण्याची प्रक्रिया जलद होते.
नारळाचे तेल अल्सरवर लावल्यास सूज कमी होते आणि अल्सर लवकर भरून येतो.
लवंगाचं तेल अँटीसेप्टिक असून, ते अल्सरवर लावल्यास वेदना आणि जळजळ कमी होते.
थंड पदार्थ किंवा आईसक्रीम खाल्ल्यास तात्पुरता आराम मिळतो आणि जळजळपणा कमी होतो.
मध हा नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल घटक आहे. अल्सरवर मध लावल्यास ते लवकर बरे होण्यास मदत होते.
या घरगुती उपायांनी अल्सरवर आराम मिळू शकतो. मात्र अल्सर वारंवार होत असतील किंवा खूप दिवस बरे होत नसतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.