मासिक पाळीमध्ये 'या' 5 गोष्टी टाळा; मिळेल वेदनांपासून आराम

Intern
Apr 28,2025


महिलांना मासिक पाळीच्या काळात वेदना, त्रास आणि अस्वस्थतेचा सामना करावा लागतो.


हे काही पहार्थ खाणे टाळल्यास या वेदनांपासून थोडा आराम मिळू शकतो.

1. कॉफी

मासिक पाळीच्या काळात जास्त प्रमाणात कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करू नये. त्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन वाढते आणि वेदना जास्त जाणवतात.

2. तळलेले पदार्थ

तळलेले आणि तेलकट पदार्थ पचनास अडचणी निर्माण करतात आणि सूज वाढवतात. त्यामुळे या काळात अशा पदार्थांपासून लांब राहणं फायदेशीर ठरतं.

3. ब्रोकोली आणि कोबी

ब्रोकोली, फ्लॉवर आणि कोबी यामध्ये असलेल्या विशिष्ट घटकांमुळे पोट फुगण्याची शक्यता वाढतात. त्यामुळे मासिक पाळीमध्ये या भाज्या टाळाव्यात.

4. आंबट पदार्थ

चिंच, लोणचं यांसारखे आंबट पदार्थ पचनावर परिणाम करू शकतात आणि जळजळ वाढवू शकतात. त्यामुळे पाळीच्या काळात हे पदार्थ खाणं टाळावं.

5. दुधाचे पदार्थ

दुध, चीज, पनीर यासारखे दुग्धजन्य पदार्थ अती प्रमाणात सेवन केल्यास पोटात गॅस आणि वेदना वाढू शकतात. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात हे पदार्थ मर्यादित प्रमाणात खावेत.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story